बांडे नदी फुलाचे बांधकाम व अपूर्ण रस्ते चे काम पूर्ण करा


बांडे नदी फुलाचे बांधकाम व अपूर्ण रस्ते चे काम पूर्ण करा

तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत (२५ गावातील) नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली : तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत येथील एकूण २५ गावातील नागरिकांना सूरजागड लोयंन्स मेटल व त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरु झाले असून यावर्षी कंपनीकडुन नागरिकांसाठी मोफत दवाखाने व शाळा स्थापन झाले. त्या करिता तेथे येण्या जाण्यास नागरिकांना पावसाळ्यात खूप त्रास सहन करावा लागत आहे कारण पावसाळ्यात नदी भरून येते व पावसाळ्यात तेथे जाण्यासाठी दुसऱ्या मार्गानी ३५ ते ४० किलोमीटर प्रवास करावा लागतो व तसेच एटापल्ली येथील बांडे नदीच्या त्या पलीकडील नागरिकांना एटापल्ली तालुका असल्यामुळे शासकीय कामे व बाजार व इतर कामासाठी आडथळा होतो. व आम्हाला मोठ्या शहरात कोठेही जायचे असेल तर एटापल्ली मार्गेच जावे लागते. परंतु पावसाळ्यात एटापल्ली ला जाण्यासाठी मोठा अळथळा निर्माण होतो व नदीतून पायी प्रवास करावा लागतो त्या करिता आम्हाला बांडे नदीवर फुल बांधकाम व अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करून देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी दिले आहे

0/Post a Comment/Comments