दुचाकीच्या अपघातात १ युवक जागीच ठार, गोंडपीपरी तालुक्यातील वढोली येथील घटना



ब्रेकिंग न्यूज

वढोली येथे दुचाकीच्या अपघातात १ युवक जागीच ठार


गोंडपीपरी तालुक्यातिल वढोली येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात करंजी येथील २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
म्रुतकाचे नाव समिर पेटकर वय २२ वर्ष रा.करंजी असे आहे. तर अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत.

गोंडपीपरी तालुक्यात दिवसागणिक अपघात घडत आहेत.मागील ३ दिवसात तिघांचा अपघाती मृत्यू झाला .
 दि.८ ऑक्टोबरला दुचाकीसह एक इसम आष्टी जवळील वैनगंगा नदीत कोसळला तर ९ ऑक्टोबरला धाबा मार्गावरील सोमनपली जवळ झालेल्या ऑटो च्या अपघातात तेलंगणा येथील एका महिलेचा मृत्यू झाला.
असे असतानाच आज दि.१० ऑक्टोबर रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास गोंडपीपरी - मूल मार्गावर वढोली राईस मिल जवळ झालेल्या दोन दुचाकीच्या भीषण अपघातात करंजी येथील समीर पेटकर याचा मृत्यू झाला.तर अन्य दोघे गंभीर जखमी 
 झाल्याची घटना घडली. समीर आणि त्याचा मित्र दोघे जण मुल येथे जात होते दरम्यान दुचाकींचा अपघात झाला.
अपघात घडताच 
 बघ्यांची गर्दी उसळली.घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांना देण्यात आली असता गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीनाउपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपुर ला रेफेर करण्यात आले आहे.पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत..

0/Post a Comment/Comments