वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात




१५ हजार रुपयांची स्विकारली लाच

राकेश तेलकुंटवार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली

गडचिरोली, 18 जून : रेतीची वाहतुक करीत असलेले दोन ट्रॅक्टर पकडून कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून 15 हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 17 जून रोजी रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने वनविभागात खळबळ उडाली आहे. धनीराम अंताराम पोरेटी (33) असे लाच स्विकारलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार याचे वनरक्षक धनीराम पोरेटी यांनी नदीतील रेतीची वाहतुक करीत असलेले दोन ट्रॅक्टर एटापल्ली नाक्याजवळ पकडून कोणतीही कायदेशिर कारवाई न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडून 30 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली व तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच रक्कम सेतु दुकानात स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोहवा नथ्थु धोटे, नापोशि राजेश पदमगिरवार, स्वप्निल बांबोळे, पोशि किशोर ठाकुर, संदिप घोरमोडे, संदिप उडाण व चापोहवा अंगडवार यांनी केली

0/Post a Comment/Comments