ब्रेकिंग वैनगंगा नदीवरील खड्ड्यांमुळे दुचाकीसह बाप -लेक पडले नदीपात्रात





आष्टी जवळील वैनगंगा नदी पुलावरील घटना,

 बापाला वाचविण्यात यश; मुलगा गेला वाहून

अहेरी - चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू आहे. अश्यातच गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह प्रकल्पातून लोह खनिजांच्या कच्चा मालाची वाहतूक जड वाहनांने सुरु आहे. 
जड वाहतुकीमुळे रस्त्यासह नदी पुलावर अगणित खड्डे पडले असून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डया हे कळायला मार्ग नाही.या आधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत.अनेकांना जीवास मुकावे लागले. काहींना अपंगत्व आले आहे असे असतानाच आज दि.८ ऑक्टोबर रोज रविवारला दुपारच्या सुमारास गोंडपीपरी कडून स्वगावी दुचांकीने येत असताना आष्टि जवळील वैनगंगा नदीपुलावर जड वाहनांच्या गर्दी मुळे खड्डा चुकीविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने दुचाकीसह दोघे जण नदीपात्रात पडले व अन्य एक जण पुलावरील रस्त्यावरच कोसळला. त्यात किशोर गणपती वासेकर हा नदीतिल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. गणपती येराजी वासेकर यास नदीतून बाहेर काढण्यात आले . शुभम बोलगडवार हा सुखरूप आहे.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक असलेली आष्टि जवळील वैनगंगा 
 नदीवरील पूल जीर्ण झाला असुन आहे.जड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडले आहेत. खड्डा चुकीविण्याच्या नादात अपघात घडला.यात एक जण नदीपात्रात वाहून गेला. घटनेची माहिती पोलीसांना कळताच आष्टि- गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सदर इसम वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

पुलावरील खड्डे जीवघेने ठरत असल्याने काही महिन्यांपूर्वी पुलावरील खड्डे बुजवीण्याची मागणी भाजपाचे नेते संजय पंदिलवार यांनी केली होती. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही .त्यामुळे सदर अपघात घडल्याचे बोलले जात असून
आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.



0/Post a Comment/Comments