स्नेह मिलन सोहळा तथा सेवा निवृत्त कर्मचारी जिवन गौरव पुरस्कार समारंभ


स्नेह मिलन सोहळा तथा सेवा निवृत्त कर्मचारी जिवन गौरव पुरस्कार समारंभ

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 


आज दिनांक 02/05/2024 रोज गुरुवारला नेशनल सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट नागपुर द्वारे राजलक्ष्मी सभागृह, आलापल्ली येथे ठिक 11.00 वाजता स्नेह मिलन सोहळा तथा सेवा निवृत्त कर्मधारी जिवन गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. श्री. किशोरजी वानखेडे, सरचिटणिस, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघटना, नाशिक उद्द्घाटक म्हणून मा. श्री. शेखरजी टोगो (कार्यकारी संचालक) एन. सि. आर. डी. कार्यालय नागपुर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजेशजी मुन, अध्यक्ष, शिवानी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपुर, श्रिनिवासजी गणमुकुलवार, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवता परिषद, अहेरी, मा. श्री आशुतोषनी चटप, अध्यक्ष, साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, चश्पुर, मा. श्री गजाननजी पातोडे, अध्यक्ष, मातोश्री लक्ष्मीबाई शिक्षण संस्था, चंद्रपुर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला विनोबा प्राप/भाग्य आश्रम शाळा, तलवाडा, हेडरी, पदेवाही, गेया, कोटमी, बिनागुंडा येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मा. टोगो साहेब यांचे पुष्प वर्भावाने स्वागत करण्यात आले व त्यांना मंचाकडे आदराने प्राचारण करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष महोदय तथा सर्व प्रमुख अतिथीचे स्वागत करून त्यांनी स्थान ग्रहण केले. त्यानंतर विद्येची आराध्य देवता माता स्वरस्वती, आचार्य विनोबाजी भावे व सुश्री निर्मलाताई देशपांडे यांच्या प्रतिमचि पुष्प माल्यार्पन करून व दिपप्रज्वलन करून विधिवत पुजन करण्यात आले. तसेच विनोबा आश्रम शाळा कर्मचारी वर्ग तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत गिताने स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शाळांचे सहशालेय उपक्रमाचे फोटो प्रोजेक्टरद्वारे उपस्थित मान्यवरांना व कर्मचा-यांना चित्रिकरण करून दाखविण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांना संस्थेतर्फे वृक्षकुंडी, शाल-श्रीफल, व स्मृतीचिन्ना देवुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण की एस.जी. शेन्द्रे, माध्य. मुख्या. विनोबा आश्रम शाळा, तलवाडा यांनी केले असुन विनोबा आश्रम शाळांची विस्तृत माहिती करून दिली. उपस्थित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे स्वागत शब्दसुमनाने करण्यात आले. तसेच विनोबा आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री सोमनकर, श्री राउत, बी खेडकर, कु. कोल्हाटरकर व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री काशिवार यांना मा. टोंगोसाहेब यांच्या हस्ते वृक्षकुंडी, शाल-श्रीफल, स्मृतीचिन्ह भेटवस्तु देवून जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2023-2024 मधिल उत्कृष्ठ कार्य करणा-या कर्मबा-यांना संस्थेतर्फे वृक्षकुंडी, शाल-श्रीफल, स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.
1) उत्कृष्ट प्राथ. शिक्षक 2) उत्कृष्ट माध्य. शिक्षक 3) उत्कृष्ट अधिक्षक 4) उत्कृष्ट स्वयंपाकी 5) उत्कृष्ट स्वयंपाकी 6) उत्कृष्ट स्वयंपाकी 7) उत्कृष्ट शिपाई
सत्कारमुर्तिची नावे व शाळा पुढिल प्रमाणे
व्ही.एल. बोमकंठीवार, वि. आ. शा. पदेवाही एस. के. मेनुगवार, वि. आ. शा. हेडरी.
 पि.यु. मारकवार, वि. आ. शा. गेदा, जी.एस. आसमवार, वि. आ. शा. कोटमी.,कु. एस. एम. निलिवार, वि. आ. शा. कोटमी. श्री एस. जी. रनदिवे, वि. आ. शा. तलवाडा, की, एन, कोल्लुरी वि. आ. शा. हेडरी
उत्कृष्ट प्राथ. मुख्या. उत्कृष्ट माध्य. मुख्या. उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन
टि. सी. तोटावार, वि. आ. शा. हेडरी एस.जी. शेन्द्रे, वि. आ. शा. तलवाडा ,उत्कृष्ट शाळा शिक्षण,विनोबा प्राथ व माध्य आश्रम शाळा, पंदेवाही,विनोबा प्राय व माध्य आश्रम शाहा, गेदा 
पुरस्कार वितरणानंतर सेवानिवृत्त शिक्षक सोमनकर यांनी आपल्या संस्येचे व आश्रम शाळेतील जीवनाबाबत मनोगत व्यक्त केले तसेच तोटावकर प्राथ. मुख्या हेडरी यांनी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना पुरविण्यात सोईसुविधा, भौतीक सोईसुविधा याबाबत मार्गदर्शन दिले तसेच चिटटीवार प्राथ. शिक्षक, यांनी शौक्षणिक‌ गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण कशाप्रकारे विद्यार्यांना देण्यात येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख राजेशजी मुन, किशोरजी वानखेडे यांनी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे तसेच कर्मचा-यांचे अभिनंदन करून आश्रमशाळा
सुव्यवस्थित कशा चालतिल याबाबत मार्गदर्शन केले. अनु. विनोचा प्राथ माध्य. आश्रम शाळा, तलवाडा वैधील पदवियर प्राथ. शिक्षक श्री चदिकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री फोरेवार (मा.शि.) यांनी केले. अशा प्रकार स्नेह मिलन सोहळयाचा पहिला माग संपविण्यात आला. लगेच उपस्थित सर्व पाहुण्यांच्या भोजनाचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.दुपारी ठिक 3.00 वाजता कार्यक्रमाचा दुसरा टप्या महणजे कर्मचारी व परिवाराचे परिचय देण्यात आले. तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक मा. श्री टोगो साहेब यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने विनोबा आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मोलाचे संदेश देवुन मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारे चर्चा सत्र संपवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0/Post a Comment/Comments