*गडचिरोली जिल्हा कुपोषण मुक्त करू - आयुषी सिंग*


*गडचिरोली जिल्हा कुपोषण मुक्त करू - आयुषी सिंग*

*पंचायत समिती कोरची येथे घेतली आढावा बैठक*


कोरची : प्रतिनिधी जितेंद्र सहारे 

         संपूर्ण जिल्ह्याला कुपोषण मुक्त करण्याच्या निर्धार जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी घेतला असून त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात कवसेर मोहीम राबविण्यात येत आहे. कवसेर म्हणजे गोंडी भाषेत चेहऱ्यावर हसू आणणे असून गडचिरोली जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या दऱ्या खोऱ्यात व डोंगराळ भागात विखुरलेला आहे. जिल्ह्यातील बहुतेक क्षेत्र हे ग्रामीण भागात येत असून सदर क्षेत्रात दळणवळणाची अपुरी साधने, रस्त्याचा अभाव यामुळे अतिदुर्गम भागात वेळेवर पोहोचणे कठीण होत असते. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला कुपोषण मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने कवसेर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभागाच्या समन्वयाने टप्पा - 1 मध्ये दिनांक 1 मे 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत SAM/MAM चे बालके शून्यावर आणण्याचा निर्धार असून टप्पा - 2 मध्ये 16 ऑगस्ट 2024 ते 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत SUW/MUW चे बालके शून्यावर आणण्याचा निर्धार घेण्यात आलेला आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील एकूण 81,730 बालके आहेत त्यापैकी SAM ची 343 व MAM 3176 बालके आहेत. याकरिता गडचिरोली जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी अंगणवाडी आरोग्य, आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
              या उपक्रमामध्ये जन्मापासून कुपोषणाचे प्रमाण थांबवण्यासाठी एलबीडब्ल्यू बालकांचे प्रमाण कमी करणे यासाठी आरोग्य व महिला बालकल्याण यांचे संयुक्त माध्यमातून गरोदर मातेला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा, आहार, औषधोपचार याची खात्री करणे व जन्माला येणारा बाळ एलबीडब्ल्यू राहणार नाही याची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अधिनस्त असलेले कर्मचारी जसे ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, एकात्मिक बालविकास अधिकारी, आरोग्य सेविका यांचे या उपक्रमाला यशस्वी बनवण्याकरिता एक विशेष योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन यायावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले.

0/Post a Comment/Comments