जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना जिवंत जाळणा­या 15 आरोपींना गडचिरोली पोलीसांनी कले जेरबंद

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना जिवंत जाळणा­या 15 आरोपींना गडचिरोली पोलीसांनी कले जेरबंद
 
सर्व 15 आरोपींना 05 दिवसांची पोलीस कोठडी 

01 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा गावामध्ये जादुटोन्याच्या संशयावरुन महिलेसह दोन व्यक्तींची गावाक­यांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 02-05-2024 रोजी पोस्टे एटापल्ली येथे दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक 01-05-2024 रोजी एटापल्ली तालुक्यातील मौजा बरसेवाडा येथील नामे 1) जमनी देवाजी तेलामी वय 52 वर्षे व 2) देवु कटिया अतलामी वय 57 वर्षे या दोघांना गावातील काही इसम एकत्र येवुन गावात पंचायत बोलावुन हे दोघे जादुटोना करतात कु. आरोही बंडु तेलामी वय 3.5 वर्ष रा. बरसेवाडा हिचा मृत्यु जादुटोना केल्यामुळे झाला असा आरोप या दोघावरती करुन यांना अंत्यत निघृनपणे मारहाण करुन अंगावरती पेट्रोल टाकुन जिवंत जाळले. मृतक जमनी देवाजी तेलामी हिचा भाऊ सादु मासा मुहोंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एटापल्ली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
 या घटनेची समाजातील सर्व स्तरातुन खेद व्यक्त करुन मारेक­यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेची गांभीर्य व तीव्रता लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी श्री. चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व श्री. निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली यांना तपास पथकासह सदरच्या प्रकरणाचा छडा लावुन आरोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरील अधिकारी व सहकारी अधिकारी यांनी अंमलदारासह बारसेवाडा येथे जावुन घडलेल्या घटनेची घटनास्थळ पाहणी करुन सखोल चौकशी अंती 15 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये 1) अजय बापु तेलामी, 2) भाऊजी शत्रु तेलामी, 3) अमित समा मडावी, 4) मिरवा तेलामी, 5) बापु कंदरु तेलामी, 6) सोमजी कंदरु तेलामी, 7) दिनेश कोलु तेलामी, 8) श्रीहरी बीरजा तेलामी, 9) मधुकर देवु पोई, 10) अमित ऊर्फ नागेश रामजी तेलामी, 11) गणेश बाजु हेडो, 12) मधुकर शत्रु तेलामी, 13) देवाजी मुहोंदा तेलामी, 14) दिवाकर देवाजी तेलामी, 15) बिरजा तेलामी सर्व रा. बारसेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांना पोस्टे एटापल्ली अप. क्र. 24/2024 मधील कलम 302, 307, 201, 143, 147, 149, भादवी, सहकलम 3 (2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना 05 दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली. 
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा., यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. चैतन्य कदम सा यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोउपनि नागरगोजे, पोउपनि म्हेत्रे, मपोउपनि गिरवलकर, व इतर सर्व अंमलदार यांनी मेहनत घेवुन गुन्हा उडकीस आणला.

।।।।।।।।।।।

0/Post a Comment/Comments