*घुग्घुस शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात,जय भीमच्या घोषणांनी गुजले शहर*


*घुग्घुस शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात,जय भीमच्या घोषणांनी गुजले शहर*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी


घुग्घुस येथे दि.१४ एप्रिल २०२४ रविवार रोजी महामानव,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुग्घुस शहरातील वार्डा-वार्डातील सकाळी बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामुहिक बौध्द वंदना घेऊन बसेच विहारत भोजन,महाप्रसाद देवुन उत्साहात साजरी करण्यात आले.

तसेच सायंकाळी वार्डा,वार्डातुन शोभायात्रा,मिरवणूक रॅली काढण्यात आली.सर्व रॅली गांधी चौक येथे एकत्रित येऊन गांधी चौक मार्गाने तहसील कार्यालयासमोर पृर्णाकृती पुतळा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकत्रित होऊन सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आले.
रॅली मध्ये जय भीमचा नारा देत,निळे झेंडे घेवून,गाजा-बाजा,डिजेच्या तालावर,आतीषबाजीच्या उत्साहात सर्व धर्म समभाव मिरवणूक होवुन शांतिपूर्वक शोभायात्रा काढण्यात आली.
तसेच सर्व राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटने द्वारे शीतपेय,पाणी,भोजनाचे स्टाॅल आवण्यात आले.

यावेळी तहसील कार्यालयासमोर पृणाकृती पुतळा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील एकत्रित झालेले अनुयायंना नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीतर्फे व्यवस्थापन करण्यात आली.

0/Post a Comment/Comments