कुकडेल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
कोरची:- जितेंद्र सहारे
कोरची येथून अंदाजे ०६ किमी.असलेल्या कुकडेल येथील बौद्ध समाज विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत नुरूटी पो.पा.कुकडेल तर प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून रमेश तुलावी सरपंच ग्रा.पं.दवंडी,सुधाराम सहारे, किशोर नंदेशवर ,शालिक कराडे बौध्द समाज माजी तालुका अध्यक्ष कोरची,दशरथ हलामी,यशवंत सहारे,मन्साराम नू्रुटी,तुकाराम हलामी,दयाराम नंदेश्वर, रुपेश नंदेश्वर, विकास सहारे,सखाराम सहारे,शैलेंद्र सहारे, राजकुमार नंदेश्वर, तुकाराम सहारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालून आपली प्रगती करून घ्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश तुलावी सरपंच तर संचालन अनिल नंदेश्वर यांनी केले व उपस्थितांचे आभार दर्शना सहारे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाढण्याकरिता बोद्ध समाज महिला पुरुष सहकार्य केले.
Post a Comment