कॅम्ब्रिज केरला मॉडेल स्कूल कोरची मधील तीन विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला


कॅम्ब्रिज केरला मॉडेल स्कूल कोरची मधील तीन विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला

इंग्रजी माध्यमातून परीक्षा केली उत्तीर्ण

कोरची:- जितेंद्र सहारे

 गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर छत्तीसगढ सीमेवर लागून असलेल्या कोरची येथील कॅम्ब्रिज केरला मॉडेल स्कूल कोरची मधील तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे. अतिदुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय 2024 प्रवेश परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या व क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेत पाचव्या वर्गात शिकत असलेल्या ख्रिस्ती मन्हेरसाय हलामी, प्रणय फगवा कोराम आणि आभास संघपाल साखरे या विद्यार्थ्यांनी चिकाटी, बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या जोरावर नवोदय विद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश मिळवला आहे व त्यांचे पुढील शिक्षण नवोदय विद्यालयात होणार आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील खूपच कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते असे असताना सुध्दा या तिन्ही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केली, ही विशेष बाब आहे. नवोदय मधील या यशाबद्दल तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडीबद्दल शाळेचे संचालक व मुख्याध्यापक किशोर ढवळे, सर्व शिक्षक, पालक संघ, आणि अनेक कोरची वासियांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments