मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जाजावंडी शाळा तालुक्यातून अव्वल

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जाजावंडी शाळा तालुक्यातून अव्वल

एटापल्ली:-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती तपासणी करण्यासाठी या शाळेला गुरुवारी भेट दिला आहे.मूल्यांकन समितीमध्ये जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी विवेक नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी आखाडे, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा यांच्या समावेश होता. या भेटीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीने विविध बाबींचे पडताळणी करून मूल्यांकन केले. ही शाळा अतिशय दुर्गम भागात असून सुद्धा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला हे उल्लेखनीय बाब आहे असे तपासणी चमूने म्हटलेआहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री, निखिल कुमरे,गट समन्वयक श्री.अशोककुमार कोवे, केंद्रप्रमुख श्री.एम.सी.बेडके,उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.लालाजी मारटकर श्री,लालू लेकामी,श्री, सुरेश मेश्राम,श्री,किसन बोरकर, श्री,परिमल नागापुरे आदी उपस्थित होते सदर शाळा आता जिल्हास्तरावर पोहोचले आहे.याबद्दल अधिकारी वर्ग,गावकरी यांनी शाळेतील शिक्षकांच्या अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments