प्रथम क्रमांक विजेत्या संघाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून ट्रॅफि व 35001-/रु पारितोषिक.!!
*मुलचेरा* :- तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.संजीव सरकार भाजपा मूलचेरा तालुका अध्यक्ष हे होते.त्यावेळी गांधीनगर येथील गावकऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा सचिव श्री.बादल शाह होते,तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा बंगाली आघाडी जिल्हा सरचिटणीस बिधान बैद्य,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक हे होते.
यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेला हाजरी लावली होती.
या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार 35001-/रु व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून देण्यात आले तर द्वितीय पुरस्कार 25001-/ रु हे शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला यांच्या कडून आणि तृतीय पुरस्कार 15001-/ रु भाजपा जिल्हा सचिव श्री.बादल शाह यांच्या तर्फ देण्यात आला.
यावेळी मोठ्या उत्साहात स्पर्धा पाहण्यासाठी गांधीनगर येथील गावकरी, युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!👇
Post a Comment