कोरची तालुक्यात आदिवासी संस्कृती प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात आदिवासी लोकांकडून साजरे केले जाणारे लयोर नृत्य

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade


कोरची तालुक्यात आदिवासी संस्कृती प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात आदिवासी लोकांकडून साजरे केले जाणारे लयोर नृत्य

कोरची:- जितेंद्र सहारे
              कोरची तालुक्यात आदिवासी संस्कृती प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात आदिवासी लोकांकडून नृत्य साजरे केले जाते त्याला लयोर नृत्य असे म्हटले जाते. आदिवासी समाजाचे धर्मगुरू लिंगो बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हे लयोर नृत्य करण्यात येते. धान्य कापनीनंतर लिंगो बाबा यांना साकडे घालण्याकरिता हे उत्सव आदिवासी बांधवातर्फे साजरे केले जाते ज्यामध्ये परिसरातील गावाचे आदिवासी नागरिक हे एका ठराविक गावी एकत्र होऊन तिथे आदिवासी समाजाचे युवक, युवती, स्त्री, पुरुष हे सर्व एकत्रित पणे आदिवासी परंपरे प्रमाणे नृत्य करतात. मागील कित्येक वर्षा पासून सुरु असलेल्या या परंपरेचे अजूनही आदिवासी बांधवानी जतन करून ठेवले असल्याचे दिसून येत आहे.
               धान्य कापणी झाल्यानंतर मळणी करण्यापूर्वी देवाकडे त्या धान्याची पूजा अर्चना करून साकडे घातले जाते त्याला संजोरी असे म्हणतात व संजोरी पूर्वी हे लयोर नृत्य करण्यात येते ज्यामध्ये पारिसरातील गावाच्या आदिवासी बांधवांचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो. नृत्यामध्ये सर्वात समोर असणाऱ्या कडे एक काठी असतो ज्यामध्ये घुंगरू वगैरे लावले जातात म्हणजे तो त्या ग्रुपचे नेतृत्व करित असल्याचे दिसून येते. त्याला झरळ अशे म्हटले जाते. हिवाळ्याच्या दिवसात शेकोटी लावून नागरिक रात्रभर या नृत्याचा आस्वाद घेऊन स्वतः सुद्धा या नृत्यात सहभागी होतात. मागील पिढ्या न पिढ्या शुरु असलेल्या या परंपरेला अजूनही आदिवासी बांधवानी जतन करून ठेवले आहे हे विशेष. आदिवासी परंपरे नुसार नैसर्गिक संसाधनाने गोटूल भवन चा निर्माण करण्यात येत असतो ज्यामध्ये नृत्य करणारे आश्रय घेत असल्याची माहिती आदिवासी बांधवांनी दिली. मुख्य म्हणजे लयोर नृत्याकरिता बाहेर गावून येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे जुन्या रीती रिवाजानुसार स्वागत करण्यात येते.

0/Post a Comment/Comments