गोंडपिपरीत चौधरी गुरूजींचे कार्य महान, परमपूज्य शेषराव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी मिळाली जागा दान

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


गोंडपिपरीत चौधरी गुरूजींचे कार्य महान, परमपूज्य शेषराव महाराजांच्या मंदिर बांधकामासाठी मिळाली जागा दान


सुरेश चौधरी यांचा पुढाकार : मंदिराकरिता जागा दान करीत जोपासली बांधिलकी


गोंडपिपरी : तालुक्यात परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष चौधरी गुरुजी यांच्या संकल्पनेतून दारू व्यसनमुक्ती संघटनेचे काम जोमात सुरू आहे. दारू सोडा-संसार जोडा या उक्तीला चौधरी गुरुजी यांनी घेऊन लावलेले इवलेशे रोपटे आज वटवृक्ष झाले. हजारो नागरिक या संघटनेशी जुडली आहेत. २०१० पासून सुरू झालेल्या प्रवासात कित्येक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचल्याचे सकारात्मक चित्र समाजात बघायला मिळत आहे. यातच गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश चौधरी यांनी त्यांचे बंधू, पं.स. गोंडपिपरीचे माजी सभापती श्रीधर चौधरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ परमपूज्य शेषराव महाराज संसार वाचवा सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेसाठी मंदिर बांधकामाकरिता नुकतीच जागा दान केली. यामुळे गोंडपिपरी तालुक्यात आता संघटनेचे कार्य अधिक भक्कम होणार आहे.

परमपूज्य शेषराव महाराज दारू सोडा संसार जोडा सेवाभावी संस्थेचे काम गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या जोमात सुरू आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागातून सोबतच तालुक्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणात गोंडपिपरीत येतात. परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना गोंडपिपरीच्या वतीने शुक्रवारी या भाविकांचा सत्संग सोहळा नियमित चालतो. अश्यातच त्यांना मंदिर बांधकामाकरिता हक्काची जागा असावी, ही गेल्या अनेक वर्षांपासून या भाविकांची इच्छा होती. यासाठी शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून सुरेश चौधरी समोर आले. त्यांनी आपल्याकडे असलेली जागा दान देण्याचे बोलून दाखवले. आणि भाविक भक्तात एकच आनंद पसरला. नुकतेच त्यांनी जागा दान देण्याच्या संदर्भातील सोपस्कार पार पाडले. या सत्कार्यात परिवारातील सर्वच सदस्यांचा सहभाग राहिला. विशेषतः श्रीधर चौधरी यांच्या अमरावती येथील ज्योती पुंडकर यांच्यासह ईतर तीनही मुलींने गोंडपिपरीत येत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या जागेवर आता मंदिर उभे राहणार आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेत सुरेश चौधरी यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सत्कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संस्थेचे मार्गदर्शक असलेले चौधरी स्वतः उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तर अध्यक्ष म्हणून गणपती चौधरी (गुरुजी) अतीशय सक्षमपणे जबाबदारी हाताळत आहेत. त्यांच्या नेतृत्वात या संघटनेची जम्बो कार्यकारिणी कार्यरत असून अतिशय उत्तम काम या माध्यमातून सुरू आहे. आज संघटनेशी हजारो नागरिकांची नाळ जुडली आहे. दारू व्यसनाने भरकटलेले अनेक संसार या माध्यमातून योग्य 'मार्गा' वर येत आहेत. मंदिरासाठी जागा दान दिल्याने चौधरी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे. 
गोंडपिपरी येथे परमपूज्य शेषराव महाराजांच्या मंदिर बांधकाम होत असल्याने व्यसनमुक्त झालेल्या भक्तांनामध्ये आनंद होत आहे.

0/Post a Comment/Comments