पथदिवे लावायला विजेच्या खांब्यावर चढला, त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं...


पथदिवे लावायला विजेच्या खांब्यावर चढला, त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं...


चामोर्शी : तालुक्यातील अनखोडा येथील ग्रामपंचायत शिपाई दिलखूश बबन निमरड याच्या 
सांगण्यावरून रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रामा आबाजी नायगमकर (वय २४ वर्ष) रा. अनखोडा असं मृत तरुण युवकाचे नाव आहे.
हि घटना गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनखोडा येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली
मयत रामा नायगमकर ग्रामपंचायत शिपायाच्या सांगण्यावरून ग्रामपंचायतीचे पथदिवे लावत होता. मात्र, ग्रामपंचायत शिपाई व मृतक हे विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना महावितरण विभागाला देण्यात न आल्याने वीजप्रवाह सुरुच होता खांबावर चढताच रामा याला जोरदार विजेचा झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत रामा हा इलेक्ट्रिशीयन म्हणून कामे करीत होता तो आपल्या आईवडिलांना एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
ग्रामपंचायतीचे काम करत असताना मृत्यू झाला असल्याने ग्रामपंचायती कडून मृत्तकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यात यावी अशी मागणी अनखोडा येथील गावकऱ्यांनी लावून धरली आहे.
घटनास्थळी आष्टी पोलिसांनी धाव घेऊन मृत्तदेह  आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे व पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जंगले हे करीत आहेत

0/Post a Comment/Comments