चामोर्शी : दि. ०२/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे बंडु निलकठ गुरूनुले वय ३९ वर्ष रा.कोनसरी हे सकाळी ०६/०० ते १४/०० वाजेपर्यंत त्याची डयुटी लॉयड मेटल अॅन्ड एनर्जी कंपनी कोनसरी येथे असल्याने त्यांनी आपली दुचाकी पल्सर गाडी क्र. एम.एच.३३ ए. ए. ३२११ कंपनीच्या वाहन पार्कींगच्या ठिकाणी लावुन डयुटीवर गेले. व दुपारी ०२/०० वाजता त्यांची डयुटी संपल्याने ते आपले वाहन घेण्याकरीता वाहना जवळ आले असता सदर वाहन
ठेवलेल्या ठिकाणी दिसुन न आल्याने सदर वाहनाची शोधा शोध करू लागले परंतु सदर वाहन मिळुन न आल्याने चोरीची तक्रार पोलीस ठाणे येथे दिली. त्यानंतर लागलीच पोलिसांनी लॉयड मेटल कंपनीची सि.सि.टि.व्ही. फुटेज चेक केले असता एक अनोळखी इसम सदर चे वाहन चोरून घेवुन जात असताना दिसले तेव्हा
पोलीस ठाणे आष्टी चे ठाणेदार पोलीस निरीक्षक कुदंन तु. गावडे यांनी व त्यांचे स्टाफ यांनी तत्परता साधुन आपली गोपनीय यंत्रना पोस्टे हददीत कार्यान्वीत करून सदर संशयित इसम व वाहनाचा पोस्टे हददीत शोध घेतला इसम
फॉरेस्ट नाका आष्टी येथे मिळुन आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने
आपले नाव पंकज भाडुजी कोडापे रा. देवई ता.पोभुर्णा जि. चंद्रपुर असे सांगीतले सदर इसमास विश्वासात घेवुन चोरीस गेलेल्या वाहना बददल त्यास विचापुस केले असता त्यानेच सदर वाहन चोरून फॉरेस्ट नाका आष्टी येथे ठेवलेले आहे असे सांगून सदर दुचाकी वाहन आरोपी कडून जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्य़ातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्या विरूध्द पोभुर्णा, कोठारी, गोडपिपरी पोलीस स्टेशन ला चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आल्याने सदर आरोपीस पोस्टे आष्टी यथे दि. ०३/११/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पो. हवा. शामराव मडावी व त्यांचे सहकारी रवी सडमेक हे करीत असून सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल सर., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. चिंता सर, श्री. यतीश देशमुख सर, उपविभागीय
पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुदंन तु. गावडे यांचे नेतृत्वात पोलीस हवालदार शामराव मडावी, पो. ना. रवी सडमेक, पोशि/अतुल तोडासे, पोशि/ रायसिडाम, पोशि/ संतोष नागुलवार यांनी पार पाडली.
Post a Comment