देसाईगंज येथील घटना रेल्वेत उडी घेऊन मुलीची आत्महत्या

देसाईगंज येथील घटना, रेल्वेत उडी घेऊन मुलीची आत्महत्या
मृत्तक जानवी राजकुमार मेश्राम

देसाईगंज (वार्ता) :-
            स्थानिक कुथे पाटील कॉन्व्हेंट येथे वर्ग ११ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीने वडसा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे समोर घड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी १०.०० वाजाच्या सुमारास घडली. जानवी राजकुमार मेश्राम (१६) रा. भगतसिंग वार्ड, देसाईगंज (वडसा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नांव आहे.
       प्राप्त माहिती नुसार दि. २२ ला कु. जानवी मेश्राम हिला तिचे वडील राजकुमार मेश्राम यांनी कॉलेजला सोडून दिले. मात्र काही वेळातच रेल्वे अपघातात मुलगी मृत्यु पावल्याची माहिती आई-वडीलांना कळली. वडसा वरून चांदाफोर्ट ला जाणारी रेल्वे गाडी वडसा स्थानाकापासून काही अंतरावरच चुना भट्टी परिसरा पर्यंत जात असतांनाच रेल्वे पटरीच्या काही अंतरावरच पटरीपासून थोडा लांब बसलेल्या मुलीने रेल्वे जवळ येताच रेल्वेत उडी घेतली. लगेच रेल्वे चालकाने रेल्वेला थाबविले मात्र तो पर्यंत आत्महत्या केलेल्या मुलीची प्राणज्योत मावळली होती. लगेच बडसा रेल्वे सुरक्षा बलचे पोलिस उपनिरीक्षक  भालेराव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घट्नास्थळ गाठून पंचनामा करून याबाबतची माहिती देसाईगंज पोलिसांना दिली. देसाईगंज पो.स्टे. चे पो.नि. किरण रासकार यांनी घटनास्थळ गाठून प्रेत उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे पाठविले तर आत्महत्या केलेल्या जानवी मेश्राम हिने आज सकाळीच आपल्या व्हाट्सअपच्या स्टेटलवर टु डे फिनीश लिहीले असल्याचे तिच्या अन्य मैत्रनींनी स्टेटज बघितल्यानंतर कळले. वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आत्महत्या केलेल्या जानवी मेश्राम हिला आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असून वडील एका स्टाईल्सच्या दुकानात ड्रायव्हर म्हणून काम करतात, जानवीच्या आत्महत्येने भगतसिंग वार्डात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments