जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोरची येथे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

@ Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोरची येथे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

कोरची:- जितेंद्र सहारे

               कोरची येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करून कार्यक्रम घेण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमोदिनी काटेंगे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश जाळे, कांता साखरे मॅडम यांनी भूषविले काही विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली इयत्ता 2 री ची निधी काटेंगे ,पेझल भैसारे इयत्ता 5 वी ची साक्षी मेश्राम,अर्णवी सहारे, करिश्मा धोंडणे यांनी सुंदर शब्दात महात्मा फुले यांच्याविषयी भाषण दिले साक्षी मेश्राम हिने इंग्लिश मध्ये महात्मा फुले यांच्याविषयी भाषण दिले. 
    महेश जाळे यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक कार्याबद्दल आपल्या भाषणातून सांगितले कांता साखरे मॅडम यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले मौल्यवान कार्य व अस्पृश्यांसाठी केलेल्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. प्रमोदिनी काटेंगे यांनी महात्मा फुलेचे आपल्या जिवनामध्ये अतिशय मोलाचे स्थान आहे हे आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कांता साखरे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन रौनक अंबादे या विद्यार्थ्याने केले.

0/Post a Comment/Comments