लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीला दिली धडक, दुचाकीस्वार गंभीर

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade
आष्टी - आलापल्ली रोडवरील मार्कंडा कंन्सोबा गावाजवळील वन विकास महामंडळाच्या डेपो जवळ अज्ञात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली त्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीररीत्या जखमी झाला आहे
गंभीर जखमी केवल विजय लोणारे वय २५ वर्ष राहणार मार्कंडा कंन्सोबा हे आपल्या दुचाकी क्रमांक.एम एच ३३ ए एफ ७६१६ ने आष्टी वरुन गावाकडे जात असताना वन विकास महामंडळाच्या डेपो जवळ आल्लापल्ली कडून येणाऱ्या अज्ञात ट्रकने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० वाजताच्या सुमारास जब्बर धडक दिली
ट्रक चालक घटनास्थळावरून रात्रोचा फायदा घेत ट्रक घेऊन पसार झाला मार्कंडा कंन्सोबा येथीलच प्रशांत लोणारे त्याच्या मागे येत असताना केवल विजय लोणारे हा जखमी अवस्थेत त्याला दिसल्याने त्याने त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली लागलीच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचाराकरिता दाखल केले प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक‌ असल्याचे कळते सदर घटनेच्या अपघाताची नोंद आष्टी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे अपघात केलेल्या ट्रकचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मार्कंडा कंन्सोबा येथील ग्रामस्थांनी केली आहे

0/Post a Comment/Comments