काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade

फोटो प्रतिनिधीक

काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी हबकला आहे. ढगाळ वातावरणानंतर काही वर्षांपूर्वी गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. त्याप्रमाणेच यावर्षीही गारपीट होईल का, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

गडचिरोली : अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी हबकला आहे. ढगाळ वातावरणानंतर मागील काही वर्षांपूर्वी गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. त्याप्रमाणेच यावर्षीही गारपीट होईल का, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यामुळे कापूस,धान काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. लागवड झालेली कापूस,धान भाजीपाला आदी पिके सध्या सोंगणी, मळणीच्या टप्प्यात आहेत. यावेळी आभाळ घोंगावत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस,धान या पिकांची सोंगणी, मळणी सुरू केली आहे. मजूर उपलब्ध नसलेल्या ठिकाणी हार्वेस्टरच्या साह्याने मळणी केली जात आहे. अवेळी पाऊस झाल्यास सर्वाधिक परिणाम धान , कापूस व भाजीपाल्यावर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे कापूस व भाजीपाला पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकावर मावा अळी पडून फुले जळण्याची शक्यता असते त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस पडला असून आता ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे 

0/Post a Comment/Comments