एटापल्ली तालुक्यात वाघाच्या हल्यात म्हैस ठारएटापल्ली तालुक्यात वाघाच्या हल्यात म्हैस ठार

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली

गडचिरोली वार्ता न्युज : दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनावरांचा जीव जात आहे. दररोज शेतशिवार परिसरात वाघ हल्ले होत आहेत. कधी यात मनुष्यहानीही होत आहे. हे व्याघ्र हल्ले कधी थांबणार, असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत. जिल्ह्यातील आरमोरी परिसरात जनावरांवर हल्ले करणाऱ्या वाघाने आपला मोर्चा एटापल्ली तालुक्यात वळविला आहे अशी चर्चा नागरिकांत केली जात आहे. वनपरिक्षेत्र एटापल्ली येथील नागुलवाडी नियतक्षेत्रातील मवेली येथील मंकेश्वर मडकाम यांच्या म्हसीवर दिनांक २७/१०/२०२३ रोजी पहाटे चार पाच वाजताच्या दरम्यान वाघाने म्हसीवर हल्ला चढविला यात म्हसीचा जागीच मृत्यू झाला त्याबाबतची माहिती गाव पाटील शिवाजी मट्टामी यांनी वनरक्षक नागुलवाडी तसेच क्षेत्रसहाय्यक भडके पेठा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांना माहिती दिली. लगेच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी करून गावकऱ्यांसमक्ष मोका पंचनामा करण्यात आला.
 यावेळी मोक्याच्या दक्षिण दिशेला शेतीकडे वाघाच्या पाऊलखुणा स्पष्टपणे आढळून आले त्यामुळे वाघानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाले सदर घटनेचा पंचासमक्ष पंचनामा करून वेर्टनरी डॉक्टर कडून शवविच्छेदन 
करण्यात आले व रात्रोच आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले सदर म्हैस हि मंकेश्वर मडकाम रा.मवेली यांची असून वनविभागाकडून नियमानुसार नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल असे वनविभाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली असल्याने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे

0/Post a Comment/Comments