बहिरमबाबा देवस्थानाचा सर्वांगीण विकास करणार - देवराव भोंगळे


बहिरमबाबा देवस्थानाचा सर्वांगीण विकास करणार - देवराव भोंगळे

बहिरम बाबा मंदिर परिसरात देवराव भोंगळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

घुग्घुस : येथील बहिरमबाबा देवस्थान परिसराच्या विविध विकाम कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 देवराव भोंगळे वेकोली प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने बहिरमबाबा देवस्थान परिसरात विविध विकास कामे करण्यात येणार आहे. 

याठिकाणी एक शेडचे सभागृह, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याचे आरो यंत्र लावण्यात येणार आहे. विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल बहिरमबाबा देवस्थानाच्या सर्व भाविकांनी राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांचे आभार मानले.
या देवस्थानाला पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सुद्धा भरघोस निधी दिला होता. यातून मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरनाचे काम करण्यात आले आहे. देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून हायमास्ट लाईट व पाणी पुरवठ्याचे काम सुद्धा करण्यात आले आहे.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, शाम आगदारी, भाजपाचे संजय तिवारी,निरीक्षण तांड्रा,साजन गोहने,विवेक(गुड्डु) तिवारी,हेमंत पाझारे,राजेश मोरपाका, तुलसीदास ढवस,सतीश बोन्डे, रामन्ना मासा, रामस्वामी कोंडावार, दुर्गेश कांबळे, महेश लठ्ठा, रवी मिसाला, संजय तगरम, सिनू कोत्तूर, प्रवीण सोदारी, सिनू पिट्टल, अरुण दामेर, बंटी बघेल, रोहित जयस्वाल, विनोद आगदारी, राजू कटकूरी, विशाल अड्डूर, लक्ष्मण अट्टेला, निळा चिवंडे, विकास बरसागडे, भानेश सोनारी, शाम कोटा, सन्नी तांड्रा, सचिन कोंडावार, आशिष वाढई, सोम पांडे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments