*शालीकराम वार्डातील अंगणवाडी परिसरातील नाली अंडरग्राउंड करून गट्टू लावा...श्रीनिवास गुडला*


*शालीकराम वार्डातील अंगणवाडी परिसरातील नाली अंडरग्राउंड करून गट्टू लावा...श्रीनिवास गुडला*

यंग चांदा बिग्रेड संस्थापक व आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या प्रमुख्य उपस्थितीत घुग्घुस नगर परिषद क्षेत्रातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी घुग्घुस नगर परिषद मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करुन समस्या तक्रार नागरिकांना सोमवार दि.८ जुलै २०२४ सोमवार रोजी नगर परिषद कार्यालय, घुग्घुस येथे आयोजित करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा तालुका उपाध्यक्ष,ग्रामीण काँग्रेस कमिटीचे श्री.श्रीनिवास गुडला यांनी शालीकराम नगर वार्ड क्र.५ येथील अंगणवाडी परिसरातील नाली अंडरग्राउंड करून गड्डू बसविण्यात यावे,कारण जुनी अंगणवाडी आहे,तिथे लहान मुले खेळतात नालीची घाण,वासेने,चिखल्यान लहान मुलांची प्रकृती खराब होवु शकेल,त्या करतांनी मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना निवेदनातून मागणी करुन समस्यावर लक्ष वेधून आपण लवकरात-लवकर कामाच समस्यावर जोर देवून नगरपरिषदेचे मार्गाने समस्या दूर करा.

याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष काँग्रेस चंद्रपुर श्रीनिवास मूर्ति गुडला, ज्येष्ठ कांग्रेस नेते शेखर तंगलपेल्ली, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपुर(इंटक)शहजाद शेख,शिवराम नागले, येसुदास आरमुला,शिवराम नागले,रमेश नातर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments