*पिढीजात संस्कार टिकवून ठेवण्यात जेष्ठांचे मौलिक योगदान*


*पिढीजात संस्कार टिकवून ठेवण्यात जेष्ठांचे मौलिक योगदान*

*गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे प्रतिपादन*

देसाईगंज-
   देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यापासून ते मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व ओळखून देश विकासात अनेकांनी आपले योगदान दिले.हे सर्व करीत असतांना समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अनेकांनी एका विचारधारेशी बांधिल राहुन कर्तव्य पार पाडले.आधीच्या पिढ्यांकडून घेतलेले चांगले अनुभव टिकवून ठेवणे आपली जबाबदारी मानुन पिढीजात संस्कार टिकवून ठेवण्यात जेष्ठांनी मौलिक योगदान दिल्यानेच समाज व्यवस्था टिकून असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.
     ते देसाईगंज येथील गजानन मंदिर देवस्थान सभागृहात आयोजित देसाईगंज तालुका काँग्रेसच्या वतिने आयोजित जेष्ठ नागरिकांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम,काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मेश्राम, माजी उपसभापती नितीन राऊत,माजी नगरसेवक प्रकाश सांगोळे,माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणे,लिलाधर भर्रे,अरुण कुंभलवार,तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पुष्पा कोहपरे,डाॅ.शिलु चिमुरकर, आरती लहरी,ममता पेंदाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
     दरम्यान मार्गदर्शन करताना माजी आमदार आनंदराव गेडाम म्हणाले की जुने जानते प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून आजही कार्यरत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे होते.वस्तुत: पदाधिकाऱ्यांनी कितीही परिश्रम घेतले तरी जमिनीस्तरावर प्रामाणिक कार्यकर्त्यांशिवाय राजकीय फळी मजबूत करणे शक्य नाही.ते काम अनुभवी जेष्ठच करू शकतात.त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक असल्याने सत्कार समारंभाचा कार्यक्रम घडवून आणण्यात आला असल्याचे सांगीतले.
    कार्यक्रमाचे संचालन संजय करंकर,प्रास्ताविक देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले तर आभार होमराज हारगुळे यांनी मानले.कार्यक्रमाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील तब्बल ८० च्या वर जेष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments