पायी जाणाऱ्या महिलेचे अपघात करून चालकाचा पळ, महिलेचा जागीच मृत्यू

जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची 
*पायी जाणाऱ्या महिलेचे अपघात करून चालकाचा पळ, महिलेचा जागीच मृत्यू*


*कोरची - मोहगाव मार्गावर वाढले अपघाताचे प्रमाण*


*कोरची :-* तालुका मुख्यालयापासून अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला एका 55 ते 60 वर्षाच्या महिलेचा मृतदेह काही युवकांना रात्री 10 च्या सुमारास दिसून आला त्यांनी याबाबत पोलीस विभागाला कल्पना दिली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सदर अपघात ग्रस्त मृत महिलेला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नेण्यात आले. सदर महिलेच्या शरीराला बघता तिचे अपघात हे संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान झाले असावे असे दिसून येत होते कारण रात्री 10 च्या सुमारास जेव्हा माहिती प्राप्त झाली तेव्हा त्या महिलेच्या शरीरावर मुंग्या लागले होते. तिचा एक हाथ व एक पाय तुटलेल्या अवस्थेत दिसून येत होता.
         या महिलेच्या जवळपास एका पुरुष व्यक्तीची एक चप्पल, चष्मा आणि दुचाकीचा फुट स्टॅण्ड दिसून आला म्हणजे सदर अपघात दुचाकीने झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत असून घटनास्थळी दुसरे कोणतेही व्यक्ती दिसून आले नाही. परंतु सदर अपघाता मध्ये रुग्णालयात कुठलाही जखमी रुग्ण भरती झाला नाही व इतका भयानक अपघात झाल्यास आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर मार्गावर खूप अपघात होत असून या मार्गावर अपघात प्रवण स्थळ असे फलक लावण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन कोरची येथे करण्यात येत आहे. मृत महिलेचे नाव राजोबाई सोनू हिडामी असून सदर महिला ही कोसमी येथून कोरची कडे नामकरण कार्यक्रम सोहळ्यास उपस्थित होती परतत असताना सदर घटना घडली.

0/Post a Comment/Comments