*कोरची येथे 50 टक्के अनुदानावर खरीप धान बियाणे वाटप*


*कोरची येथे 50 टक्के अनुदानावर खरीप धान बियाणे वाटप*  

*कोरची:- जितेंद्र सहारे*     
                                                                                      पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने 13 वने 7 टक्के वन महसूल अनुदान योजना अंतर्गत सन 2024-25 या वर्षाकरिता खरिप धान लागवडीस 50% सुट्टीवर जिल्हा परिषद गडचिरोलीचे कृषि विकास अधिकारी प्रदिप तुमसरे यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना तालुक्यात वेळीच धान बियाणे उपलब्ध करून दिले असता *पंचायत समिती कार्यालयात विरेंद्र चौधरी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या हस्ते* वितरणास कोरची येथे सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कृषि अधिकारी रेणू दुधे ,विस्तार अधिकारी देवानंद फुलझेले ,सहायक लेखा अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली संजय मेश्राम, सहायक प्रशासन अधिकारी कोरची उमेश लोहकरे ,सहायक लेखा अधिकारी कोरची जयप्रकाश कार व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते सण 2024 या वर्षात खरिप हंगाम करिता कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 45 क्विंटल एमटी यु 1010 हे धान बियाणे उपलब्ध झाले असुन वेळीच *बियाणांची उचल करण्यात यावी उत्तम दर्जाचे बियाणे लागवड करण्याचे आवाहन पंचायत समिती कृषि विभागाचे वतीने गट विकास अधिकारी राजेश फाये यांनी केले*

0/Post a Comment/Comments