*तरुण पिढीच्या भविष्यासाठी प्रत्येकानी लोकचळवळ म्हणून झाडे लावा - सागर मूलकला यांचे आवाहन...!**तरुण पिढीच्या भविष्यासाठी प्रत्येकानी लोकचळवळ म्हणून झाडे लावा - सागर मूलकला यांचे आवाहन...!* 


सिरोंचा - तालुक्यात उन्हाळा एवढा कडक झाला आहे की गेल्या १०० वर्षात जेवढे उन पडले नव्हते तेवढी उष्णता या वर्षात निर्माण झाली आहे. काही भागात ४० ते ५५ पर्यंत उष्णता पारा गेला आहे. व त्यामुळे जवळ जवळ देशातील ६० ते १०० व्यक्तीचा मृत्य उष्माघतामुळे झाला आहे, उष्णतेमुळे शेतमजूर, कामगार ,विद्यार्थी व सर्व सामान्य
माणसे भोवळ येऊन बेशुद्ध पडत आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या तान वाढत आहे. शेतकऱ्यांची कामेही या उष्णतेमुळे रखडली आहेत. मित्रहो तुम्हाला पुढील नवतरुण व लहान बालकांना जिवंत ठेवायचे असतील तर प्रत्येकानी कमीत कमी २० झाडे लावण्याची व ती जगवण्याची हमी प्रत्येक गावातील, शहरातील नागरिकांनी घेतली पाहिजे त्या शिवाय वातावरणात बदल घडणार नाही. 
         झाडे ही - उष्णता, पाणी याचे शोषण करतात त्यामुळे जमिनीची धूप न होता ओलावा, थंडावा निर्माण होतो. व जमिनीत पाणी साठवण क्षमता वाढते. शासनाने तर प्रत्येक वेळेस झाडे लावून जगवत आहेत, परंतु ते कमी प्रमाणात होत आहेत. त्यामुळे आपणही सामाजिक बांधिलकी समजून ज्या भागात राहतो त्या प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे ,त्यांनी झाडे लावून ती झाडे - जगवण्याची शपथ घेतली पाहिजे. तरच आपली भावी पिढी वाचेल , उष्णतेमुळे मानवाचे जीवनमान धोक्यात येईल. त्याला कुलर, पंखा है - थंडगार करणारे यंत्र हे काहीही करू शकणार नाहीत,
 त्याकरिता मित्रहो निसर्गाचा - रहास थांवण्यासाठी प्रत्येकानी झाडे लावा झाडे जगवा ही - शासकीय योजना कडे न पाहता - लोकचळवळ करून प्रत्येकानी या पावसाळ्यात झाडे लावून - देशाला व राज्यातील भावी तरुण पिढीला वाचवावे ,असे सिरोंचा तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ता सागर मूलकला यांनी सोशल मीडिया द्वारे तालुक्यातील नागरीकांना आव्हान केली आहे,

0/Post a Comment/Comments