गर्कापेठा येथील कुम्मरी परिवाराला माजी आमदार दिपकदादा यांची सांत्वनपर भेट.


गर्कापेठा येथील कुम्मरी परिवाराला माजी आमदार दिपकदादा यांची सांत्वनपर भेट.

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून राजन्ना कूम्मरी यांना आर्थिक मदत

सिरोंचा:तालुक्यातील गर्कापेठा येथील राजन्ना कूम्मरी आपल्या कुटुंबियासहीत शिवरात्री च्या दिवशी नदीवर गंगास्नान करण्यास गेले असता त्यांचा मुलगा नागराज कुम्मरी हा आपल्या मित्रांसोबत खोल पाण्यात आंगोळीसाठी गेला होता मात्र अचानक तो पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन त्याला जलसमाधी मिळाली ही बाब सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना स्थानिक पदाधिकारी मार्फत माहिती दिल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी गर्कापेठा येथे राजन्ना कुम्मरी यांच्या घरी भेट देऊन त्यांना सांत्वन करून आर्थिक मदत दिले.


आर्थिक मदत देतेवेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत मादाराम ग्रामपंचायत चे सरपंच दिवाकर कोरेत,माजी उपसरपंच व्यंकटी कारसपल्ली,आवीस सल्लागार ईश्वरजी कोटा,आविस सल्लागार विजय रेपालवार,गणपतजी वेलादी,समय्या कोंडागोर्ला,रवी रामटेके,अशोक मडावी,सुधाकर दुर्गम,नागेश कुम्मरी,शंकर दुर्गम,मलय्या सडमेक,बन्नी कोंडागोर्ला,अंकुलु दिकोंडा,व्यंकटस्वामी रामटेके,जुलेख शेख,विनोद कावेरी,चंद्रमोगली मोडेम,समीर कोटरंगे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments