माजी राज्यमंत्री राजें अंब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली युवकांचा भाजपा पक्ष प्रवेश


माजी राज्यमंत्री राजें अंब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली युवकांचा भाजपा पक्ष प्रवेश


सिरोंचा तालुक्यातील अंकिसा,बालमुत्यमपल्ली,
जंगलपल्ली,गेर्रेपल्ली येथील अनेक युवकांचा समावेश.


गडचिरोली:- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकिसा,बालमुत्यमपल्ली,जंगलपल्ली,गेर्रेपल्ली या गावांतील विविध पक्षाच्या अनेक युवा कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री राजें अंब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर व त्यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून भाजप पक्षात प्रवेश केला.त्यावेळी राजे साहेबांनी भाजप पक्षाचा दुपट्टा गळयात टाकून सर्व युवकांचे स्वागत केले.

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजें अंब्रिशराव आत्राम यांनी आपल्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रात केलेली विविध विकास कामे,त्यांची कार्यकर्तृत्ववान शैली आणि प्रभावशाली युवा नेतृत्व गुणामुळे आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवक प्रभावीत होत आहे आणि अनेक युवावर्ग त्यांना आपला आदर्श मानून भाजप पक्षात प्रवेश करत आहेत.

अंकीसा क्षेत्रातील भाजप पक्षाचे नेते श्रीनाथ राऊत,मुरलीधर रच्चावार,प्रकाश गणपुरपु,शामसुंदर मेचनेनी,रंगू देवेंद्र,महेश गंजीवार,कार्तीक कलकोठा,भास्कर कोठारी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी कार्यक्रमात युवा नेते कुमार अवधेशबाबा आत्राम,सिरोंचा तालुका भाजप अध्यक्ष शंकर नरहरी,भाजप प्रकोष्ठ संतोष पडालावार,शहर अध्यक्ष दिलीप सेनिगारपु,गजाननजी कलाक्षपवार,श्रीकांत सुगरवार,सदनपु चंद्रय्या,विजय कलक्षेपवार तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.🪷

0/Post a Comment/Comments