मोंडी रामा कावरे यांना वाकिंग स्टिक घेण्यासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत

Gadchirolli varta news portal 
मोंडी रामा कावरे यांना वाकिंग स्टिक घेण्यासाठी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत.

सिरोंचा :तालुक्यातील मोयाबीनपेठा येथील रहिवासी मोंडी रामा कावरे यांना अपघातात एक पाय गमवावा लागला होता,ही बाब रेगुंठा परिसरात दौऱ्यावर आलेले भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना आविस च्या पदाधिकारी कडून माहिती देताच माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मोंडी कावरे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून त्यांना चालण्यास अडचण होत आहे म्हणून वाकिंग स्टिक घेण्यास आर्थिक मदत दिले.
मोंडी कावरे यांची वाकिंग स्टिक घेण्याची अडचण दूर झाल्याने कावरे कुटुंबीय माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले
     
यावेळी सिरकोडा ग्रामपंचायत चे सरपंच लक्ष्मणजी गावडे,आवलमरी चे माजी उपसरपंच व्येंकन्नाजी कोंडापे,आवीस सल्लागार वाईल तिरुपतीजी,आविस सल्लागार विजयजी रेपालवार,समय्या दुर्गे,आविस सल्लागार स्वामीजी जाकावार,व्येंकय्याजी जाकावार,इंदाराम ग्रामपंचायतचे सदस्य शाकिर शेख,आवीस कार्यकर्ते व्यंकटस्वामी रामटेके,आनंद कोटा,अहेरी शहराध्यक्ष मिलिंद अलोने,पत्रकार आनंद दहागावकर,जुलेख शेख,विनोद कावेरी,रवीजी कुम्मरी सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments