सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीची पदभरती घोटाळा प्रकरणी विषयांवर होणाऱ्या गडचिरोली येथील सुनावणी रद्द करुन सिरोंचात घ्या : परीक्षार्थी - सागर मूलकला यांची मागणी...!


सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीची पदभरती घोटाळा प्रकरणी विषयांवर होणाऱ्या गडचिरोली येथील सुनावणी रद्द करुन सिरोंचात घ्या : परीक्षार्थी - सागर मूलकला यांची मागणी...!सिरोंचा :- सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध पदभरती जानेवारी महिन्यात घेण्यात आली होती, त्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा घेणाऱ्या संस्थेनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकटवर्तीयांना परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून त्यांनच पदावर निवड होतील असे (आक्षेप) पूर्व सूचना म्हणुन तालुका काँग्रेस पक्ष तसेच विद्यार्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे,
             तरीही सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पदभरती करिता घेण्यात आलेल्या परिक्षेत घोटाळा झाला आहे,
              त्याकरिता परिक्षार्थी आणि पालक वर्ग तसेच तालुका कांग्रेस पक्षाकडून सदर परीक्षा रद्द करण्यात यावी, आणि परीक्षा घेतलेल्या संस्थेसह सहकाऱ्यांवर
गुन्हा दाखल करण्यात यावी, परिक्षेत घोटाळाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विविध मागणी घेऊन तहसिल कार्यालय समोर दाह दिवस उपोषण देखील करण्यात आले आहे,
        त्यानंतर संबधित कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिरोंचा येथे परीक्षार्थींकडून बयान घेण्यात आले होती,
          उपोषणाची दखल घेत संबधित अधिकाऱ्याकडून येत्या ४ मार्च रोजी, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाभराती घोटाळ्याची गडचिरोली येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे,
               त्या सुनावणीत एकही परीक्षार्थींना सूचना किंवा पत्र न देता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे,
             सादर आयोजित सुनावणी गडचिरोली येथे रद्द करुन सिरोंचात घेण्यात यावी, आणि सदर सुनावणी परीक्षा दिलेल्या परिक्षार्थीसमोर घेण्यात यावी, सादर सुनावणी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत घेण्यात यावी, आणि C C कॅमेरात घेण्यात यावी,अन्यथा पुन्हा एकदा परीक्षार्थीं व पालकांकडून तीव्र आंदोलन शिवाय पर्याय नाही, असे परिक्षार्थी - सागर मुलकला सह बाधित परिक्षार्थीकडून इशारा देखील देण्यात आली आहे,

0/Post a Comment/Comments