*भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण !!*


*भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण !!*

*सिरोंचा:-* तालुका मुख्यालयात भाग्यश्री ताई फॅन्स क्लब तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सिरोंचा येथे पहिल्यांदाच मोठ्या रकमेचे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रथम पारितोषिक तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपये तर द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ ठेवण्यात आले होते.मोठे पारितोषिक आणि आकर्षक शिल्ड असल्याने तेलंगाणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र असे तीन राज्यातील खेळाडूंनी हजेरी लावत याठिकाणी उत्कृष्ठ खेळ दाखविला.यात एम डी शानु यांच्या संघाने प्रथम तर रवी रालाबंडीवार यांच्या संघाने द्वितीय पारितोषिक पटकाविले.

अंतिम सामन्यात तेलंगाणा राज्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट असा खेळ दाखवला.अत्यंत चुरशीच्या लढतीत एम डी शानु यांचा केकेआर संघ विजय झाला.अंतिम सामना पाहण्यासाठी जवळ तीन ते चार हजार क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.सामना आटोपतच भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुने म्हणून नगराध्यक्ष बबलू पाशा,राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,रायुका चे अध्यक्ष एम डी शानु,नगरसेवक रंजित गागापुरपवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, नगरसेवक जगदीश रालाबंडीवार, नागेश्वर गागापुरपवार, सत्यम पिडगू,रवी रालाबंडीवार, मदनय्या मादेशी, रवी सुलतान आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments