*आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले नूतन निवासस्थान


*आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले नूतन निवासस्थान*

*माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण !!*

*सिरोंचा:-* तालुक्यातील अंकीसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी नूतन निवासस्थान बांधकाम करण्यात आले असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

अंकीसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली जुनी इमारत मोडकळीस गेल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.१५ लाख रुपयांच्या निधीतुन सदर चार खोल्यांची इमारत दुरुस्त करण्यात आली.नुकतेच काम पूर्ण झाल्याने भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून इमारत किरकोळ दुरुस्ती करण्याची मागणी होत होती.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि कर्मचाऱ्यांची अडचण देखील दूर झाली.लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी येथील सरपंच सरिता पेदा,वैद्यकीय अधिकारी अशोक लाटकरी,सुनील येलकुवार,श्रीनिवास गटलावार, प्रभाकर शानगोंडा,कार्तिक जणगाम,मांतय्या अत्यम,गणेश टेकाम,नागमनी टेकाम,वैकुंठम गोलकोंडा,तिरुपती कतला,वेंकटेश्वर शानगोंडा,रमेश कस्तुरी,तिरुपती जाडी,श्रीनिवास बेडके आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments