माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने कोटापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित


माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने कोटापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित.


सिरोच्या तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.!*सिरोच्या* :- गोल्डन सी सी कोटापल्ली,स्व.राजेश सुंकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने कोटापल्ली येथील मैदानात आयोजित करण्यात आले होते.


यावेळी क्रिकेट स्पर्धक मोठ्या प्रमाणावर या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी झाले होते.


भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला 41000/-(एक्केचाळीस हजार रुपये) माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला 31000/-(एकतीस हजार रुपये) व्यंकटस्वामी पोलमपल्ली व सुधाकर पेद्दी यांच्या कडून आणि तृतीय क्रमांक विजेत्या संघाला 21000/-(एकवीस हजार रुपये)संतोष पडलवार,अनंतराव बिरदू,तिरुपती बोड्डूवार, नागेश्वर पोलमपल्ली यांच्या कडून हे बक्षिसे देण्यात आले.


सिरोच्या तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते हे संपूर्ण बक्षीस वितरण करण्यात आले.भाजपचे सिरोच्या तालुका अध्यक्ष शंकर नरहरी,भाजपा प्रकोष्ठ अध्यक्ष संतोष पडलवार,भाजपा उपाध्यक्ष मलाना संघरती,युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष संपत दया,भाजपा तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर चमकरी,सोशल मीडिया ग्रामीण संयोजक रवी दुर्गम,उपसरपंच सुरेश मडावी,राकेश येबरी, श्रीनिवास चिलकुमार तसेच भाजपचे कार्यकर्ते,युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

0/Post a Comment/Comments