*चिंतारेवला येथे ५० लाख रुपयांच्या निधीतून होणार विकास कामे*


*चिंतारेवला येथे ५० लाख रुपयांच्या निधीतून होणार विकास कामे*

*भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न !!*

*सिरोंचा:-* तालुक्यातील चिंतारेवला ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल ५० लाखांच्या निधीतून विकास कामे केली जाणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

तालुक्यातील अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या चिंतारेवला ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध विकास कामे करण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल ५० लाख रुपयांची निधी दिली आहे. या निधीच्या सदुपयोग करून गावात विविध विकासात्मक कामे केली जाणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.

नुकतेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना भाग्यश्री ताई आत्राम यांनी चिंतारेवला येथे भेट देऊन विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.यावेळी येथील सरपंच लक्ष्मी कंदेला,उपसरपंच तिरुपती जाडी,लक्ष्मण येरावार,श्रीनिवास गुंडाबोईना,तिरुपती गुंडाबोईना, जनार्दन बिसुता,रमेश गोमासे तसेच चिंतारेवला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments