*गेवर्धा तंटा मुक्ति समिति पदी राजू बाराई यांची चौथ्यांदा निवड*
🖋ताहिर शेख🔸
१०/०९/२०२४ कुरखेडा:- गेवर्धा आज दी.१०/०९/२०२४ ला गेवर्धा येथे सांस्कृतिक सभा गृह मध्ये गट ग्राम पंचायत ची संयुक्त ग्राम पार पडली या सभेमध्ये विविध विकास कामांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले तर l तंटा मुक्ति समितीचे फेरनिवड करीत तंटा मुक्ति समिति अध्यक्ष पदा करीता दोन नाव सभेमध्ये आल्याने लोकशाही पद्धतिने मतदान करून करण्यात आले l सभेमध्ये सूचवलेल्या उमेदवार माधुरी नितिन शेन्डे यांना ३७ मत तर राजू बाराई यांना १५२ इतके मत मिळाल्याने सलग राजू बाराई यांना चौथ्यांदा विजय घोषित करण्यात आले l
या सर्व प्रक्रियेत निवडनुक अधिकारी म्हणून कृष्णा मस्के, दिनेश कावळे, द्यानेश्वर् मस्के, अमिता नहामुर्ते, यांनी बघितली या प्रसंगी विजयी उमेदवार राजू बारई यांना ग्राम पंचायत सरपंचा सुषमाताई मडावी व उपस्थित गावकर्यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन ग्राम पंचायत सभाग्रुह गेवर्धा येथे शुभेच्छा देण्यात आले
विजय उमेदवार यांनी सर्व ग्राम सभेचे सभासद व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत
Post a Comment