*अहेरीतील तान्हापोळ्यात तान्हुल्यांची ऊसळली गर्दी*
*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांतर्फे भरघोस बक्षीसे*
*सक्षम प्रतिक मुधोळकरने पटकावला प्रथम क्रमांक*
*अहेरी:-* सालाबादा प्रमाणे कन्यका परमेश्वरी देवस्थानाच्या आवारात तान्हापोळा कृती समिती तर्फे तान्हा पोळा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. तान्हा पोळा महोत्सवात शेकडो नंदीधारक बालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामुळे एकच गर्दी झालेली पहायला मिळाली.महोत्सवादरम्यान विविध स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.नंदी सजावट,नंदीधारकाची वेषभुषा व सामाजिक विषयांसाठी भरघोस माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांतर्फे पारितोषीके सुध्दा देण्यात आली.प्रथम पुरस्कार सक्षम प्रतिक मुधोळकर याला मिळाला तर स्पर्श सर्वेश्वर मांडवगडे याला दुसरे तसेच भुमी नितीन दोंतूलवार हिला तिसरे आणि अर्वीश वैभव कवीश्वर यास चौथे पुरस्कार मिळाले.
नव्या राहूल दोंतूलवार, कियारा सुमित मोहुर्ले,नेहाल चित्तेश्वरराव आत्राम,सुरभी सचिन पेद्दापल्लीवार, अन्मय राकेश मुप्पावार,अभिग्या शेखर वडेट्टीवार इत्यादी चिमुकल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले.बक्षीस वितरण सोहळ्याला अहेरी इस्टेटचे कुमार अवधेशराव बाबा,सहाय्यक पोलिस निरीक्षक वळवी साहेब तथा आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष संतोष मद्दीवार मंचावर ऊपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन प्रविन पुल्लूरवार यांनी केले.प्रास्ताविक वैभव चिमरालवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन विनोद विश्वनादूलवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment