छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेध:काँग्रेस पक्षाच्यावतीने आष्टीत निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज बुधवार सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा कांग्रेस उपाध्यक्ष नाना पसफूलवार यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ नामदेव किरसाण, ॲड विश्वजीत कोवासे,सोमनपल्ली ग्रामपंचायत सरपंच निलकंठ निखाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद कांबळे, शंकर पाटील मारशेट्टीवार यांनी आपल्या मनोगतात मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित आंदोलकांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणा देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस युवक सचिव विश्वजीत कोवासे यांनी राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारावर सडकून टीका केली.
या निषेध आंदोलनाला आष्टी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते व आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त होता
Post a Comment