*मंत्रिपदापेक्षा मला माझं समाज महत्वाचं; मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम*


*मंत्रिपदापेक्षा मला माझं समाज महत्वाचं; मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम*

*आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा*

अहेरी:माझ्या आयुष्यात मी अनेकदा निवडून आलोय आणि मंत्रिपद देखील भूषवले आहे.आता तर थेट कॅबिनेट मंत्री झालोय.असे मंत्रिपद येते आणि जाते.मात्र,माझ्या समाजामुळेच माझी ओळख आहे. त्यामुळे मला मंत्रीपद महत्वाचा नसून माझं समाज महत्वाचं असल्याचं वक्तव्य राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.आलापल्ली येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके चौकात आयोजित जागतिक आदिवासी दिनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सह उदघाटक म्हणून माजी आमदार दिपक आत्राम,विशेष अतिथी म्हणून माजी जि प अध्यक्ष अजय कंकडालवार,माजी जि. प. सदस्य सौ अनिता दिपक आत्राम,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, वीर बाबुराव स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव आत्राम,सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती इंदरशहा मडावी,माजी सेवानिवृत्त वनाधिकारी हनुमंत मडावी, ज्येष्ठ नागरिक सुखरू कोरेत, ईश्वर वेलादी, रघुपती सिडाम, पतृजी आत्राम,श्रीमती जन्नुबाई नैताम, सांबय्या करपेत, प्रभाकर आत्राम, बंडू आत्राम, लक्ष्मण तोर्रेम, व्यंकटी मडावी, रमेश मडावी, ग्रामपंचायत सदस्य विजय कुसनाके,संतोष अर्का, मनोज बोलुवार,कैलास कोरेत तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री आत्राम यांनी सर्व सामान्य नागरिकांनी भरभरून प्रेम देल्यानेच मला मंत्री पदापर्यंत मजल मारता आली.या पदाचा प्रत्येक समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडेच माझं लक्ष होता आणि राहील.प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव पुढे गेला पाहिजे त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न सुरू आहे.मात्र,काही लोकं आपल्या आदिवासी समाजमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी वज्रमुठ बांधण्याची गरज आहे. राजकारणात आपण कितीही विरोधक असलो तरी समाजासाठी मात्र एकत्र येणे ही काळाची गरज झाली आहे.त्यामुळे समाजाच्या कार्यक्रमात राजकारण न करता समाज हिताचा काम करण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावं असे आवाहन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

सह उदघाटक म्हणून बोलताना माजी आमदार दिपक आत्राम यांनी देशात मोगल आले,निजाम आले त्यानंतर इंग्रजांनी राज्य केला.त्यात आपल्या समाजाचा मोठं नुकसान झालं. आदिवासी समाज हा देणारा समाज होता. मात्र आता विविध योजना घेऊन जीवन जगावे लागत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आपल्याला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळालं. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून आपल्या चालीरीती आणि रूढी परंपरा देखील लुप्त होताना दिसत आहेत.त्यामुळे ते टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करतानाच त्यांनी आदिवासी समाजावर नॉन क्रिमिलियरची अट लादण्यात येत असून पुढे समाजात वर्गीकरण केले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधव शासकीय योजना पासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.आयोजित कार्यक्रमात आदी मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले.

दरम्यान जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीर बाबुराव स्मारक समितीतर्फे अल्लापल्ली शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली.कार्यक्रमात चिमुकल्यांनी नृत्य सादर करत पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुर्गम भागात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते कैलास कोरे यांनी केले तर आभार सरपंच शंकर मेश्राम यांनी मानले.आयोजकांनी सुंदर असा कार्यक्रम आयोजित करून एकाच मंचावर सर्व मान्यवरांना एकत्रित केले.

0/Post a Comment/Comments