या दहा दिवसात आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणार


*या दहा दिवसात आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणार!*

           *सहायक अभियंतांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना पत्राद्वारे दिले माहिती...!*

अहेरी : आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या दोन राष्ट्रीय महामार्गची अभियंतांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यासंदर्भात काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पत्र देऊन सदर रस्ता सुरळीत सुरू करण्याची मागणी केली.

जर पर्यायी रस्ताची दुरुस्ती करून न दिल्यास आंदोलन करण्यात येणार असा इशारा केला होता.तर संबंधित विभागाने आलापल्ली ते सिरोंचा व आलापल्ली ते भामरागड या रस्त्यावरील पुलांकरीता खोदकाम करण्यात आले त्या फुलीयाचे बाजूने सिमेंटपाईप टाकून वळणमार्गाची सुव्यवस्तीत अशी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करणार अशे दि.१३/८/२०२४ पासून दहा दिवसात पूर्ण करुन वाहतूक सुरू करण्यात येईल.

तसेच एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना करुन एसटी बसेस ची वाहतूक पुर्ववत करण्यात येईल तसेच वाहतूक सुरळीत सुरू राहील असे पत्र माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना सहायक अभियंता श्रेणी २ रा.म. उपविभाग आलापल्ली व सहायक अभियंता श्रे-2 रा.म.उपविभाग धानोरा यांनी दिले आहे.

0/Post a Comment/Comments