*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे शिरा व केळी वाटप!*
*नागपंचमी निमित्य नाग माता मंदिर येथे भाविकांची अलोट गर्दी!*
*अहेरी:-* तालुक्यातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या नाग मंदिर येथे नागपंचमी निमित्य पूजेसाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. नागपंचमी निमित्य नागमाता मंदीर येथे लाखोच्या संख्येने भक्त येत असतात.यावेळी तेथे आलेल्या भक्तांना माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे तर्फे शिरा व केळी वाटप करण्यात आले.एवढेच नव्हे तर मोठ्या श्रद्धेने आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौजफाटा उभी केली होती.कार्यकर्त्यांनी भाविकांची काळजी घेत सर्वांना सहकार्य केले.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भाविक मोठ्या श्रद्धेने याठिकाणी येऊन पूजा करतात.नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करून दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करतात.सकाळ पासूनच याठिकाणी गर्दी झाली होती.मंदिर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ट्रॉफीक जाम होऊ नये म्हणून पोलिसांचाही चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांनी ही भाविकांची गैरसोयी काढण्यासाठी सहकार्य केले.
प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री संतोष मद्दीवार,ऊपाध्यक्ष दिपक तोगरवार,महामंत्री अभिजित शेंडे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुचित कोडेलवार,श्रीनिवास नामनवार,सागर बिट्टीवार, अंकुश शेंडे,हर्षीत वर्मा,रितीक कुंभारे, इ. भाजपा कार्यकर्ते तथा सेवा संप्रदाय भक्त परिवारचे विजय भाऊ खरवडे,अनिकेत खरवडे इत्यादी भक्त परिवारांने परिश्रम घेतले.
Post a Comment