*लकवा आजाराने ग्रस्त असलेल्या इसमास..!*
*काँग्रेसनेते अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या कडून आर्थिक मदत...!*
अहेरी : तालुक्यातील महागाव खुर्द येथील अर्जुन पानेम यांची काही दिवसांपासून लकवा आजाराने ग्रस्त असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलकीची असल्याने दवाखान्यात जाऊन उपचार करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण भासत होती.म्हणून त्यांनी उपचारासाठी न घेता आपल्या घरीच राहत आहे.आज माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे महागाव खुर्द येते दौऱ्यावर होते.
या दौऱ्याच्या वेळी येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अर्जुन पानेम यांच्या आजाराविषयी व त्यांच्या आर्थिक परिस्थिती बाबत अजय कंकडालवार यांना सांगितले होते.कांकडलवार यांनी आपली दोरा आटोपून परतीत अर्जुन पानेम यांच्या घरी जाऊन त्यांचा तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.तसेच त्यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत दिली.अजयभाऊ कंकडलवार यांच्या कडून अर्जुन पानेम यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. पानेंम यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
लकवाग्रस्ताला आर्थिक मदत करतांना वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत दिलीप मडावी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,राजेश दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,भिमाना पानेम,चंद्राजी रामटेके,अमर गरगम,शंकर पनेम,गौरुबाई मुंजामकर,जयपाल कोरेत,श्रीनिवास आलम,सदस्य ग्रामपंचायत महागाव खुर्द,दिलीप मडावी सरपंच किष्टापुर, अरविंद पुंगाटीसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment