*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून रामटेके परिवाराला ताळपत्री तसेच घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत...!*
अहेरी : तालुक्यातील महागाव खुर्द येथील जेष्ठ नागरिक मल्लूबाई रामटेके,राजेश विठ्ठल रामटेके यांनी काल रात्री भर ज़ोपेत असतांना मुसळधार पाऊस पडल्याने त्यांचे घर माती विटांचा घर असल्यामुळे पावसाच्या पाणी दिवालीच्या बाजूला जमा झाल्यामुळे घरच्या एकाबाजुच्या भिंत कोसळले होते.कोणालाही जीवित हानी नाही.
मात्र त्यांच्या घरचा भिंत कोसळल्याने या पावसाळ्यात घरात राहणे त्या रामटेके कुटुंबियांना अडचण भासत होती.त्या रामटेके परिवाराची आर्थिक समस्या स्थानिक कार्यकर्ते कडून काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच आज महागाव खुर्द येथे जाऊन त्या रामटेके घरचा पाहणी करून त्यांची घरचा समस्या जाणून घेतले आहे.
तसेच रामटेके परिवाराला आर्थिक मदत अंत्यत आवश्यक असल्याने माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून ताळपत्री तसेच घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.ताळपत्री घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत मिळल्याने रामटेके कुटुंबियांनी अजयभाऊंची आभार मानले आहे.
यावेळी वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,राजेश दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,वंदना दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,भिमाना पानेम,चंद्राजी रामटेके,अमर गरगम,शंकर पनेम,गौरुबाई मुंजामकर,जयपाल कोरेत,श्रीनिवास आलाम सदस्य ग्रामपंचायत महागाव खुर्द,अरविंद पुंगाटीसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
Post a Comment