*बोरमपल्ली येथील रोहीत्र बिघडल्याने दहा दिवसापासुन परिसरातील विजपुरवठा बंद!*
*राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या निर्देशानंतर नवे विद्युत रोहीत्र (electric transformer) रवाना,परिसरातील नागरिकांनी मानले राजेंचा आभार!*
*आलापल्ली:-* सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली परिसरात विद्युत रोहीत्रामध्ये बिघाड झाल्याने परिसरातील गावात अंधाराचे साम्राज्य होते.तेथील कार्यकर्ते मल्लन्ना संगर्ती यांनी समस्या माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या निदर्शनास आणुन दिले असता राजे साहेबांनी संबंधीत अधिकार्यांना तात्काळ रोहीत्र पुरविण्याच्या सुचना दिल्या आणि वाहन व्यवस्थेला ऊशीर होण्याची शक्यता असल्यामुळे खाजगी वाहन स्वखर्चाने पाठविले. पोळा इ.सण अंधारात जाऊ नये यासाठी तात्काळ ऊपाययोजना करण्यात आली.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष मद्दीवार, विकास उईके नगरसेवक, अक्षय संतोषवार, आकाश रंगुवार, विनोद जिल्लेवार,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते!👇
Post a Comment