*मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सभा मंडपाचे लोकार्पण*


*मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सभा मंडपाचे लोकार्पण*

*चेरपल्ली आणि गड बामणीला मिळाले सुसज्ज सभा मंडप*

अहेरी:स्थानिक नगर पंचायत हद्दीतील चेरपल्ली आणि गड बामणी येथील दोन सभा मंडपाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.

नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली आणि गड बामणी हे अत्यंत महत्वाची गावं असून याठिकाणी स्थानिकांना गावातील विविध कार्यक्रम आणि सभा घेण्यासाठी गावात सभा मंडप नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे दोन्ही गावात सभा मंडप बांधकाम करुण देण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली होती.गावकऱ्यांची अडचण लक्षात घेता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दोन्ही गावांसाठी मोठी निधी उपलब्ध करून दिली.

नुकतेच चेरपल्ली आणि गड बामणी येथील सुसज्ज सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून ९ ऑगस्ट रोजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.गावकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्वरित सभा मंडप बांधकाम करून दिल्याने दोन्ही गावातील गावकऱ्यांनी मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांचे गावात आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, नगरसेवक अमोल मुक्कावार,सुरेंद्र अलोने,मान्तय्या आत्राम,चेरपल्ली येथील कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष नारायण बोटकुटे,राजेश्वर सूनतकर,अरुण रामटेके,विजय बोरकुटे,सोमाजी झाडे,मलय्या रामटेके,अमोल रामटेके आणि गड बामणी येथे नंदू सिडाम,प्रभाकर कुसराम,आनंद राव पेंदाम,रवी दब्बा तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments