*शासकीय योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी जीवनमान उंचवावे:मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम*
*पेरमिली येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा*
अहेरी: आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासना तर्फे शेकडो योजना राबविण्यात येत आहेत. महायुती सरकारने देखील त्यात आणखी नवनवीन योजना आणली आहे. या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचवावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.९ ऑगस्ट रोजी पारंपारिक पेरमीली इलाका पट्टीतील सर्व ग्रामसभांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार दीपक आत्राम, कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, गडी शेंडीया पट्टी चे संजय सडमेक,सरपंच किरण नैताम,पाटील विठू मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प सभापती इंदरशाहा मडावी, माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,संभा हिचामी, सांबय्या करपेत तर या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ऍड.किशोर पुंगाटी, ऍड.बंडू आत्राम, ऍड.गणेश बोगामी, शिक्षक वामन मडावी, नारायण सिडाम, डॉ. गणेश मडावी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आदिवासी समाजाला आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.मुख्य रस्ते,नदी नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यांत मुख्य रस्त्याशी जोडल्याशिवाय खेड्यांचा विकास शक्य नाही. त्यामुळे या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आली असून बरेच कामे प्रगतपथावर आहेत.येत्या काळात सर्वच रस्ते, नदी नाल्यावर पूल बांधकाम झाल्याचे दिसून येणार आहे. याव्यतिरिक्त शिक्षण, सिंचन आणि रोजगार देऊन सर्वांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी आपण स्वतः पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले एवढेच नव्हे तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित मान्यवरांनी देखील समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बहुतांश गावातील आदिवासी बांधवांनी रॅली काढत परिसर दणाणून सोडला.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या प्रतिमांना नमन करून सप्तरंगी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात केले. यावेळी परिसरातील हजारो आदिवासी बंधुभगिनी उपस्थित होते
Post a Comment