सूरजागड मालवाहक ट्रक चिरडून मृत्यू झालेल्या वृध्द महिलेची कुटूंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्या - दोषींवर कठोर कारवाई : सागर मूलकला ...!
तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...!
गडचिरोली :- गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी रोड वरील वाकडी फाट्यावर एका माल वाहक ट्रक ने स्कूटी चालक वृध्द दाम्पत्याला धडक दिल्याने धडकेत वृध्द महिला जागीच ठार तर वृध्द पुरुष थोडक्यात वाचला आहे, ही घटना काल दुपारी 4.15 मिनिटाला घडली आहे,
मृतक महिलेचा नाव- कुंदा जनार्दन आखाडे ,वय 62 वर्ष निवासी - कुनघाडा असून सूरजागड वरून खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या एकदम जवळ येताच बॅलन्स बिघडल्याने स्कूटीस्वार दाम्पत्य भांबावून पडले, त्यामुळे वृध्द महिला ट्रकच्या खाली चिरडल्या गेल्याने महिलेची जागीच मृत्यू झाली आहे, ही गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत गांबिर आणि दुर्दैव्या घटना आहे,
तत्काळ त्या मृत महिलेचा कुटूंबियांना सूरजागड लोह खनिज प्रकल्प कडून ५० लाखांची आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, तसेच संबधीत कंपन्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुका रा,काँ,(श.प) पक्षाचे उपाध्यक्ष - सागर मूलकला यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पटवून मागणी करण्यात आली आहे,
Post a Comment