*कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील घटना* *२८ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण अवजाराने हत्त्या*

ताहिर शेख प्रतिनिधी कुरखेडा 

कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील घटना,२८ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण अवजाराने हत्त्या
🖋ताहिर शेख🔸०९/०८/२०२४:- कुरखेडा:-   

चिखली येथील एका
युवकाची तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली असल्याचे प्रकरण घडले आहे l मृतक युवकाची ची ओळख चिखली येथील जितेश भोवनदास पगडवार वय २८ वर्ष अशी आहे.

मृतकाचे नातेवाईकांनी कुरखेडा पोलिसठाण्यात तक्रार दाखल केले असून पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तपास चक्रे फिरवत गावातील काही संशयतांना ताब्यात घेतले असल्याचीप्राथमिक माहिती आहे. सदर हत्या ही नेमकी कुणी व कश्यासाठी केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मृतकाची काही दिवसापूर्वी गावातील काही लोकांसोबत विवाद झालं होता अशी चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments