*मोहगाव येथे युवतीची गळफास घेऊन आत्महत्या*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची तालुका मुख्यालयापासून 2 किलोमिटर अंतरावर असलेल्या मोहगाव येथे 18 वर्षीय युवती प्रेमी चंद्रभान मडावी हिने आपल्या राहत्या घरीच दुपारी 2 ते 3 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही
युवती ही आपल्या आजी सोबत मोहगाव येथे राहत होती. प्रेमी हिला आई, बाबा, आजी 1 बहीण व 2 भाऊ असा परिवार असून प्रेमी हिचे आई, वडील व मोठा भाऊ हे छत्तीसगड येथे शेती च्या कामाकरिता वास्तव्यास असून धाकटा भाऊ हा आपल्या उदर निर्वाहकारिता परराज्यात मोलमजुरीचे काम करतो.
आज दुपारी 4 च्या दरम्यान या युवतीची आजी जेवण्याकरिता आत मध्ये गेली असता तिला बघून धक्काच बसला कारण तिच्या नातीन ने गळफास लावून आपले जीवन संपविले होते. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे शिक्षण 2 वर्षापूर्वी 10 वी पर्यंत झाले असून सध्या ती मुलगी मजुरीच्या कामावर जात होती. नेमके या घटण्यामागचे कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत.
Post a Comment