*काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून रुग्नास उपचाराकरिता आर्थिक मदत..!*


*काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून रुग्नास उपचाराकरिता आर्थिक मदत..!*

अहेरी : तालुक्यातील शांतिग्रम येथील संजीत रतन हलदार (वय 44) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डायलासीस करण्याकरिता त्याना अडचण भासत होती.याबाबत काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथील त्यांच्या मुलगा राज हलदर यांनी अजय कंकडालवार यांना भेट घेऊन त्यांच्य वडिलांचा अडचण सांगितले होते.कंकडालवार यांनी हलदर घरचा परिस्थिती बघुन मदतीचा हात पुढे करत त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,शांतीग्राम ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत समजदार सुशांत बेपारीसह आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments